आमदार चिमणराव पाटील यांची विकासकामांना भेट..

एरंडोल (कुंदन सिंह ठाकुर) आमदार चिमणराव पाटील यांनी सात जानेवारी 2022 रोजी येथील होत असलेल्या विविध विकास कामांना भेट देऊन कामांची पाहणी केली यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी दर्जेदार काम करण्याची सूचना केली विशेषतः रंगार खिडकी पासून गांधीपुरा भागात जोडणाऱ्या पुलाच्या कामाची पाहणी त्यांनी केली.
कासोदा रस्त्यालगतच्या स्मशानभूमीतील काम, आनंद नगरातील व अष्टविनायक कॉलनी मधील ओपन स्पेस या प्रमुख कामांना भेट देऊन पाहणी करण्यात आली.
यावेळी धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, शहर संघटक मयूर महाजन, चिंतामण पाटील, प्रवराज पाटील, गोविंद बिर्ला शंतनु भेलसेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.