फातिमा शेख यांची जयंती व पुण्यतिथी शासनाने साजरी करावी- मनियार बिरादरी ची मागणी… आज १९२ वी जयंती निमित्त शासनास साकडे.

जळगांव (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील पहिली मुस्लिम महिला शिक्षक होण्याचा सन्मान प्राप्त करणारी ज्योतिबा व सावित्री बाई फुले यांच्या कार्याला बळ देण्यासाठी आयुष्य देणारी व शाळेला सर्वप्रथम आपली स्वतःची जागा व घर देणारी फातिमा शेख ही फुले दांपत्याची सहकारी असली तरी त्यांची जयंती ,पुण्यतिथी अपेक्षेप्रमाणे साजरी होत नाही एवढेच नव्हे तर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यासंदर्भात शासनाच्या यादीत फातिमा शेख यांचे नाव नसल्याने महाराष्ट्र शासनाने त्या प्रशासकीय यादीमध्ये फातिमा शेख यांचे नाव समाविष्ट करून त्यांच्या कार्याचा सन्मान करावा अशी मागणी जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या माध्यमाने करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी बिरादरीचे निवेदन स्वीकारले व खरोखरच फातिमा शेख यांचे कर्तृत्व दातृत्व हे आपण गुगल वरून वाचले असून इतिहासात त्याची नोंद असली तरी पाहिजे तसा सन्मान फातिमा शेख यांचा झालेला नाही आपल्या या भावना आम्ही शासनास कळवतो असे त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
*मुस्लिम मन्यार बिरादरीचे शिष्टमंडळात यांचा होता समावेश*
जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वात अब्दुल रऊफ रहीम, अल्ताफ शेख, मुजाहिद खान, कासार फजल, मोहसीन युसुफ, रफिक शेख, ताहेर शेख, झुलकरनयन, मोहसीन शेख, समीर शेख आदींचा समावेश होता.
फोटो कॅप्शन
निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देताना अब्दुल रऊफ अब्दुल रहीम, फारुख शेख व इतर मान्यवर दिसत आहे