आ.फारुख शाह यांच्याकडून देवपूर स्मशानभूमी च्या दुरावस्थेची पाहणी.

धुळे (अनीस, खाटीक)
धुळे शहरातील देवपूर येथील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे मृतदेह च्या ओट्यावर अग्नीडाग दिला जातो त्याओट्यांची अवस्था खूपच वाईट झालेली आहे.अनेक ओटे मोडकळीस आलेले आहेत ओट्या वरील लोखंडी जाळी रेलिंग तुटलेली आहे मृतदेहांना अग्नी डाग देताना अनेक समस्या निर्माण होतात सरण रचातांना मृतदेह पडेल की काय अशा प्रकारची शंका आणि भीती नागरिकांमध्ये असते या संदर्भातील वारंवार तक्रारीआ.फारुख शाह यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या म्हणून आज आ.फारुख शाह यांनी देवपूर स्मशानभूमी येथे पाहणी केली या पाहणीच्या वेळेस सोबत धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील शहर अभियंता कैलास शिंदे विद्युत विभागाचे उपअभियंता नरेंद्र बागुल नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक सईद बेग नगरसेवक गणी डॉलर तसेच कैसर अहमद ,शहजाद मंसूरी, जुबेर खान,अशोक मराठे,दीपक माळी,संतोष गवळी,हर्षल माळी,नानाभाऊ माळी,तुषार चौधरी,पंकज गुरव अनिल मराठे आदी उपस्थित होते. एकूणच देवपूर स्मशान भूमीतील ओट्यांची अवस्था बघून आ.फारुख शाहयांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून वीस लक्ष रुपयांचा निधी तातडीने दिला आणि तसे पत्र आयुक्त अमिता दगडे पाटील यांना सुपूर्त केले.