अजित पवार गटाची कागदपत्रे बनावट..
शरद पवार गटाचा निवडणूक आयोगाकडे दावा..

24प्राईम न्यूज 7 Oct 2023 केंद्रीय निवडणूक आयोगात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्हाच्या मुद्दयावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यावेळी अजित पवार गटाने बनावट कागदपत्रे सादर केल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते. पुढील सुनावणी सोमवार, ९ ऑक्टोबरला होणार आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार यांच्या गटाची भूमिका मांडली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून वकील मानिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला. अजित पवार गटाकडून यावेळी थेट पक्षावर दावा करण्यात आला. तसेच शरद पवार यांच्याकडून पक्षात मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला.