महाविकास आघाडीचा सोयगावात निषेध; कंत्राट भरती अध्यादेश प्रकरण–
छायाचित्र ओळ-सोयगाव शहरात निदर्शने करतांना भाजपचे कार्यकर्ते..

सोयगाव/साईदास पवार
महाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश काढून या अध्यादेशाचे खापर महायुतीच्या सरकार वर फोडून राजकारण करू पाहणाऱ्या महा विकास आघाडीच्या नेत्यांच्या शनिवारी सोयगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र शब्दात भाजप च्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी भाजपा च्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन तास निदर्शने करून घोषणाबाजी केली
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बद्री राठोड माजी.नगराध्यक्ष कैलास काळे,संजीवन सोनवणे,मयूर मनगटे ,सुनील ठोंबरे, योगेश पाटील, ईश्वर शिरसागर,प्रदीप चव्हाण ,मुन्ना ढगे, समाधान आगे, विशाल गिरी,संजय पाटील,आनिस तडवी, राजू पोटदुखे,नारायण राठोड,रूपचंद पवार,बाळू तात्या, धनसिंग राठोड ,पप्पू राठोड,शेखर ठाकरे,इस्माईल पटेल,पुनमचंद चव्हाण,भिवा चव्हाण,अनुप तडवी, धनसिंग परदेशी,अरुण काळे व सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते…