सोयगाव तालुक्यात दर शनिवारी होणार आयुष्यमान भव आरोग्य शिबीर-डॉ श्रीनिवास सोनवणे यांची माहिती..

सोयगाव/साईदास पवार
.सोयगाव तालुक्यातील गरजू आणि गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी यासाठी तालुक्यात गावागावात आयुष्यमान भव आरोग्य योजने अंतर्गत सोयगाव तालुक्यात दर शनिवारी या योजनेचे शिबिर घेण्यात येईल अशी घोषणा शनिवारी (ता.२१)तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास सोनवणे यांनी केली दरम्यान सोयगाव तालुक्यात शनिवारी (ता.२१)सोयगाव ग्रामीण रुग्णालयसह प्राथमिक आरोग्य केंद्रात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीनिवास सोनवणे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले
सोयगाव तालुक्यात दर शनिवारी हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आयोजित करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुष्य मान भव कार्यक्रम अंतर्गत रुग्णांची मधुमेह, अति उचरक्तदाब, तपासणी करण्यात आली त्यावेळी वे्दीकीय अधिकारी डॉ सोनवने साहेब, डॉ महेश जाधव , औषधं निर्माण अधिकारी हर्षल विसपुते, आरोग्य सहायक अनिल जोहरे,आरोग्य सेवक श्रीराम चव्हाण, आरोग्य सेविका,संगीता वानखडे, शिंदे,कांचन बेंद्रे, निलेश वानखडे,सागर घायवत, ईश्वर निकम आदींची उपस्थिती होती….