मनोज शिंगानेच्या नालायक कृत्याला साथ देत पत्रकाराला धमकवणाऱ्या धुळे येथील संजय शर्माविरोधात पोलिसात तक्रार दाखल…

अमळनेर(प्रतिनिधी) येथील विवादित व्यक्ती मनोज शिंगाने याने गेल्या रविवारी काही लोकांच्या मदतीने एका धर्माच्या अंत्यविधीच्या ठिकाणी असलेली संरक्षण भिंत पाडून टाकली होती. तर अमळनेर शहरात ज्याही धार्मिक वाद निर्माण झाले त्यात मनोज शिंगानेचा मोठा हात होता. त्या विरोधात दिव्य लोकतंत्रचे संपादक समाधान मैराळे यांनी वृत्त प्रकाशित केले होते. तर त्यास अटक होण्यासाठी देखील वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या बाबत अनेक ठिकाणांहून फोन येऊन बातम्या बंद करण्याचे देखील आवाहन करण्यात आले.
मात्र मनोज शिंगाने याचा तट्टू संजय शर्मा याने त्या बातम्यांचा राग मानून दिव्य लोकतंत्रच्या संपादकांना फोन करून अभद्र भाषेचा वापर केला असून शिवीगाळ देखील केली आहे. तर तुम्ही शिंगाने विरोधात बातमी प्रसिद्ध केली म्हणून तुम्ही हिंदू नसून त्या …. धर्माचे असल्याचा जणू दाखलाच संजय शर्मा याने दिला आहे. तर तू मनोज शिंगानेच्या रस्त्यात जाऊ नको अन्यथा तूला बघून घेऊ असेही त्याने धमकावले आहे.
दरम्यान पोलिसांनी मनोज शिंगाने यास तात्काळ अटक करून संजय शर्मा याच्यावर कारवाई व्हावी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.