विविध मागण्यांसाठी अमळनेर येथे कोळी समाजातर्फे रास्ता रोको..

अमळनेर/प्रतिनिधि

विविध मागण्यांसाठी येथील महाराणा प्रताप चौकात कोळी समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराणा प्रताप चौक ते दगडी दरवाजापर्यंत तर धुळे रोड, कचेरी रोडपर्यंत वाहनांच्या रांगा दिसत होत्या.
टोकरे कोळी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरु आहे. तरीही शासन उपोषणकर्त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असून त्याच्या निषेधार्थ अमळनेर येथे रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी शासनातर्फे सुनील नंदवाळकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. कोळी समाजाचे कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.