पुरावे असलेल्यांना तातडीने कुणबी दाखले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे: आरक्षणासंदर्भात तीन माजी न्यायमूर्तींची समिती..

0

24 प्राईम न्यूज 31 Oct 2023

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी
करून जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती
निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या न्यायमूर्ती
संदीप शिंदे यांच्या समितीचा अहवाल मंगळ वारच्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला जाईल. न्या. शिंदे समितीला ज्यांचे पुरावे आढळून आले आहेत, त्यांना तातडीने दाखले दिले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयात दाखल क्युरेटीव्ह याचिकेवर मराठा आरक्षणातील त्रुटी
दूर करून बाजू भक्कम करण्यासाठी राज्य
सरकारने निवृत्त न्यायमूर्ती भोसले, न्या.
गायकवाड आणि न्या. संदीप शिंदे यांची समिती
गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती
मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासंदर्भात
सरकारला मार्गदर्शन करणार असल्याचेही
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!