मुख्य निवळकर्ता इंझमाम यांचा पदाचा राजीनामा.

24 प्राईम न्यूज 31 Oct 2023
पाकिस्तानी क्रिकेटमध्ये मोठा गोंधळ सुरू झाला आहे. मेगा टूर्नामेंटमध्ये सलग चार पराभव पत्करून पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर पडला आहे. सध्या पाकिस्तान 6 सामन्यांत 2 विजय आणि 4 पराभवांसह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. भारताकडून पराभूत झाल्यापासून संपूर्ण पाकिस्तान कर्णधार बाबर आझमच्या मागे लागला आहे. त्याचवेळी आता मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक यांनी मोठा निर्णय घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्य निवडकर्ता म्हणून इंझमची ही दुसरी खेळी होती, परंतु विश्वचषकातील कामगिरीमुळे ती अकाली संपुष्टात आली. पीसीबीने इंझमामच्या पदाचा राजीनामा दिल्याची पुष्टी केली आहे..