भिडे वाड्याचा मार्ग मोकळा… आदिवासी एकता संघर्ष समितीच्या मागणीला यश..

24 प्राईम न्यूज 3 Oct 2023
जानेवारी 1848 रोजी भिडे वाडा पुणे येथे मुलींची पहिली शाळा शिक्षण महर्षी , क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली होती. त्यांच्या ह्या अतुलनीय कामगिरी मुळेच आज महिला शिक्षित होऊन प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असून स्वाभिमानाने आयुष्य जगत आहेत. शिक्षण हीच यशाची, विकासाची गुरुकिल्ली असल्याचे जाणून 18 व्या शतकात अत्यन्त वाईट परिस्थितीत मुलींची पहिली शाळा सुरू करणे हे अत्यन्त कठीण होते. तरीही सर्व अडचणींवर मात करत स्त्रियांच्या उद्धारासाठी शिक्षण सुरू करून क्रांतिकारी पाऊल फुले दाम्पत्याने उचलले होते.आज मात्र पुणे येथील भिडे वाड्यातील ह्या वास्तूची दयनीय अवस्था आहे. ही ऐतिहासिक वास्तू पडण्याच्या मार्गावर असून इथे अनेक लोकांनी अतिक्रमण देखील केले आहे.आज 173 वर्ष ह्या शाळेला पूर्ण होत आहेत. आपणास विनंती की ह्या अत्यन्त क्रांतिकारी, ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करून ह्या वाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे.तसेच सदर वास्तूच्या संवर्धनासाठी उपाय योजना राबवून ही वास्तू सुरक्षित करावी अशी मागणी आदिवासी एकता संघर्ष समितीच्या संस्थापक प्रदेश अध्यक्षा प्रा जयश्री साळुंके दाभाडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, संबंधित अधिकारी, पक्ष पदाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली होती. आज या मागणीला यश मिळाले असून
पुणे महापालिकेने सदर खटला जिंकला आहे.माझी लहान बहीण ऍड निशा चव्हाण हीने सुप्रीम कोर्टात सदर केस मध्ये युक्तिवाद केला. आणि सुप्रीम कोर्टाने भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक घोषित करून जतन करण्याचे, अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. आदिवासी एकता संघर्ष समितीने दि 1 जाने 2022 रोजी मा मुख्यमंत्री सह पुणे आयुक्त, महापौर आणि इतर संबधित प्रशासकीय अधिकारी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून भिडे वाड्याचे संवर्धन करून राष्ट्रिय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती… आनंद हा की एकाच घरातील दोन बहिणींनी वेगवेगळ्या मार्गाने सदर विषय हाताळत यश संपादन केले आहे.