थिएटरमध्ये आतषबाजी प्रेक्षकांनी फटाके फोडून दिवाळी केली साजरी..

24 प्राईम न्यूज 14 Nov 2023

सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपट शोच्या दरम्यान मालेगाव येथील थिएटरमध्ये प्रेक्षकांनी फटाके फोडून दिवाळी साजरी केली. फटाके वाजवल्याने चित्रपटगृहात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेऊन चौकशी सुरू केली मालेगावच्या मोहन थिएटरमध्ये रविवारी रात्री ९ ते १२ शोच्या वेळी ही घटना घडली. सलमान खानच्या याचित्रपटाचा आनंद प्रेक्षक घेत होते. तेव्हा काही प्रेक्षकांनी सीटवर फटाके फोडायला सुरुवात केली. या घटनेचा पूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. थिएटरमध्ये फटाके नेण्याची परवानगी कोणी दिली. त्यांची सुरक्षा तपासणी केली नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.








