अजितदादा गटाचे आमदार भाजपमध्ये जाणार आमदार रोहित पवार यांचे खळबळजनक भाकीत.

24 प्राईम न्यूज 14 Nov 2023 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील आमदार भाजपमध्ये जातील, असे खळबळजनक भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केले.

अजित पवारांच्या दिल्ली भेटीबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले की, अजित पवार आणि अमित शाह यांच्यातील दिल्लीतील भेट सदिच्छा असू शकते, पण त्या भेटीत भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याचीतक्रारही असू शकते, कारण भाजपला अनेकानेक आश्वासने द्यायची सवय आहे, पण दिलेली आश्वासने भाजप पूर्ण करत नाही.आमच्याकडून सत्तेत गेलेले आमदार नाराज आहेत. लोकसभेपर्यंत त्यांना वापरून घेतले जाईल, नंतर त्यांना सोडून दिलं जाईल. सत्तेत जाताना ठरल्यानुसार भाजप वागत नाही किंबहुना मदत करत नाही, असा आमदारांचा सूर आहे. काही विषयांत भाजपकडून मदत होणार होती, ती देखील होत नाही. त्यामुळे एकंदरित सत्तेतल्या दादा गटातल्या आमदारांची नाराजी आहे. लोकसभा झाल्यानंतर आमच्यातून फुटून गेलेला गट आणि शिंदे गटातील काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यताही रोहित पवार यांनी बोलून दाखवली.