जोशाबा संस्थेचा उपक्रम.
दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य वाटप. –

सोनगीर/प्रतिनिधि

सोनगीर येथील जोशाबा सांस्कृतिक क्रीड़ा मंडळ संस्थेतर्फे अंध अस्थिव्यंग,अपंग बांधवांना दिवाळी सण साजरा करता यावा या साठी तीस दिव्यांग कुटुंबांना किराणा साहित्य (सर्व प्रकारच्या 15 ते16 वस्तु) वाटप करण्यात आले.तसेच आई वडिलांची छत्रछाया हरपलेल्या अनाथ व निराधार मुलांना कपडे आणि किराणा साहित्य वाटप करीत त्यांच्या सोबत दिपावली साजरी केली.
जोशाबा सांस्कृतिक क्रिडा

मंडळाच्या वतीने दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य व अनाथ निराधार मुलांना नवीन कपडे तसेच किराणा साहित्य देऊन दिवाळी गोड केली आहे.जोशाबा संस्था ही गेल्या विस ते पंचवीस वर्षापासून दिव्यांग, निराधार आदिवासी,अनाथ मुले वंचीत भटके बांधवांसोबत दिवाळी सण साजरा करतात.त्याच बरोबर समाजपयोगी उपक्रमात दिव्यांग बांधवांचा वधूवर परीचय मेळावा व विवाह सोहळा,अपंग बांधवांना कृत्रिम हात तसेच जयपूर पाय बसवून देणे,डोळ्याचे व सर्व रोगनिदान शिबिर,गरीब व निराधार व्यक्तींना कपडे व किराणा साहित्य वाटप असे विविध उपक्रम राबवित असते.यावर्षीही तीस दिव्यांग कुटुंबांना व अनाथ मुलांना कपडे देऊन किराणा साहित्य वाटप केले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोनगीर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले तसेच विविध कार्यकारी सोसायटी चे माजी चेअरमन राजेंद्र महाजन अध्यक्षस्थानी होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आरिफ खाॅ पठाण, ओम स्टिलचे संचालक योगेश पाचपुते,युवा नेतृत्व अमित बागुल, ग्रामपंचायत माजी सदस्य प्रमोद धनगर, पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी, जेष्ठ पत्रकार एल.बी चौधरी,दापुराचे सरपंच किशोर पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर पावनकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जोशाबा मंडळाचे रमेश माळी, नंदलाल बडगुजर, देविदास बडगुजर,सचिव सौ.वंदना माळी, एल.बी चौधरी,पी.के शिरसाठ,
संतोष खैरनार, अशोक माळी,अशोक (सरपंच)माळी, कुणाल माळी, जितेंद्र पाटील, सचिन देशमुख, उमेश खलाणे,इत्यादीनी परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकीचा उपक्रम साठी अनमोल मदत- उद्योजक लखन शेठ रुपनर बाभळे, पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी ,मा.सरपंच वाल्मिक दामु वाणी सोनगीर,जुजैर बोहरी, मुन्ना जगताप, किशोर पावनकर,
आदींनी सहकार्य केले.प्रास्ताविक जोशाबा मंडळाचे अध्यक्ष रुग्ण मित्र -दिलीप माळी यांनी केले. सूत्रसंचालन किशोर पावनकर तर आभार प्रदर्शन जोशाबा मंडळाचे संचालक पी.के शिरसाठ यांनी केले.
