देशभरातील भाविकांनी भेट देत हवनात्मक पूजा, अभिषेक केले, व देव दर्शनचा घेतला लाभ. ————– – -दिवाळी पाडव्यानिमित्त मंगळग्रह मंदिरात लोटला होता भाविकांचा जनसागर.

0

अमळनेर/ प्रतिनिधि

दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिराला देशभरातील भाविकांनी भेट देत हवनात्मक पूजा, अभिषेक केले,देव दर्शन घेतले.
विशेष पौराणिक महत्त्व असलेल्या पाडव्याच्या दिवस आणि शासकीय सुटी यामुळे आयुष्यात सारे काही मंगल व्हावे यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमध्ये तरुण वर्गाचा मोठा समावेश होता, हे विशेष.
आदल्या दिवशीच ( सोमवारी ) अनेक भाविक मंदिरात मुक्कामी होते. मंगळ ग्रह सेवा संस्थेने त्यांची उत्तम बडदास्त राखली होती.पहाटे पाच वाजेपासून अभिषेक, पूजा व दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांच्या अलोट गर्दीने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होेते.

अनेक भाविकांना या मंदिरात आलेले दिव्य मंगलमय अनुभव पाहून व ऐकून आम्ही येथे आलो.येथील प्रशासन,स्वछता,प्रसाद,पूजा पद्धतीने आम्ही खूप प्रभावित झालो आहोत. आता आम्ही वारंवार येऊ.
-नल्ला श्वेता, विशाखापट्टणम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!