संतुलन हॉस्पिटल गैर कृत्य प्रकरणी बलात्काराचे कलम लावून आरोपी सह डॉक्टर व हॉस्पिटल वर कारवाईची मागणी..

जळगाव/प्रतिनिधि

१४ नोव्हेंबर रोजी जळगाव शहरातील संतुलन हॉस्पिटल येथे एका २६ वर्षीय महिलेसोबत तेथील वाढवाय निलेश ज्ञानेश्वर बाविस्कर राहणार कांचन नगर शनिपेठ जळगाव वय ३५ वर्ष याने गैरकृत्य केल्याने महिलेने बलात्काराचा प्रयत्न अशा स्वरूपाची तक्रार करूनही जिल्हा पेठ पोलिसांनी फक्त विनयभंगाचा गुन्हा नोंदविला व आरोपी ची पोलीस कोठडीची मागणी न केल्याने आरोपीला त्वरित जामीन मिळाला त्या मुळे समाजात समतंप्त प्रक्रिया उमटल्या व मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले परंतु भाऊबीज ची सुटी असल्याने कार्यालय बंद होते.
परंतु भाऊ बिजेला एका परकीय जिल्ह्यातील बहिणीला न्याय मिळवण्यासाठी जळगावकर बंधू एकत्रित आल्याने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सुट्टीचा दिवस असून सुद्धा त्यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री इंगोले यांना पाठवून शिष्टमंडळाची तक्रार घ्या व मला सादर करा असे आदेश दिले यावेळी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉक्टर जयस्वाल हे सुद्धा पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित झाले.

शिष्टमंडळाची मागणी
१) पोलिसांनी फिर्यादीची बलात्काराचा प्रयत्न अशी तक्रार असताना सुद्धा फक्त विनयभंगाची तक्रार का नोंदवली ? सदर गुन्ह्यात ३५४ ऐवजी भादवी३७६
लावण्यात यावे.
२)जिल्हा पेठ पोलीस तपासी अंमलदार श्रीमती वंदना राठोड यांनी न्यायालयात सी सी टीव्ही फुटेज व आरोपीने फिर्यादी सोबत केलेले
गैरकृत्य चे पेन ड्राईव्ह जप्त केलेले नसतांना सुद्धा आरोपीची पोलीस कस्टडी ची मागणी न करता न्यायालयीन कोठडी का मागितली ?
३)फिर्यादीच्या तक्रारीनुसार संतुलन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश चित्ते हे जळगावात हजर नसताना सुद्धा पेशंटला भुल तज्ञ डॉक्टर श्रीमती वंदना पाटील यांनी भूल देऊन उपचार का केले म्हणून डॉ चित्ते व डॉ वंदना याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा
४)दवाखान्यातील वरिष्ठ कर्मचारी याने पेशंट सोबत बॅड टच करीत असल्याची सत्यता पडताळण्यासाठी रुग्णाचे पतीने हिडेन कॅमेरा लावून रेकॉर्डिंग करून हा प्रकार उघडकीस आणला ,यापूर्वी संबंधित आरोपीने असे गैरकृत्य किती महिलांसोबत केले असावे त्याबाबत सुद्धा चौकशी होणे क्रमप्राप्त आहे.
५)रुग्णालयात संपूर्ण परिसरात तसेच ज्या ठिकाणी पेशंटला बेशुद्ध करण्यात येते त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे हेतू पुरस्कर लावले नाही म्हणून दवाखान्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा.
६) फिर्यादीला पोलीस स्टेशन येथे सकाळी १० ते दुपारी २ असे चार तास का थांबवून ठेवण्यात आले?
७)तक्रारदार व तिचे पती यास पोलिसांनी आरोपीला आम्ही आपल्या समक्ष पट्टे मारतो तुम्ही तक्रार करू नका अन्यथा तुम्हास वारंवार कोर्टात,पोलीस स्टेशनला यावे लागेल अशी अप्रत्यक्ष धमकी का दिली गेली.
८) डॉक्टर चित्ते यांनी सुद्धा रुग्णाच्या पतीस दोन लाख रुपयाचे आमिष देऊन तक्रार दाखल करू नका अन्यथा तुम्हालाच त्रास होईल अशी धमकी दिली त्याबाबत सुद्धा कारवाई होणे आवश्यक आहे
९) आरोपी जामिनावर सुटल्यामुळे त्याच्यावर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत ११० ई ग प्रमाणे प्रतिबंधात्मक कार्यवाही त्वरित करण्यात यावी
९) मेडिकल कौन्सिल कडे पोलिसांनी अहवाल सादर करून दवाखान्याचा परवाना रद्द करावा.
अशा प्रकारच्या मागण्या केल्या असून यावर ७ दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व त्या सोबतच न्यायालयात, मेडिकल कौन्सिल, महिला आयोग ,ह्यूमन राईट व पोलीस अकॅडमी कडे तक्रार करण्यात येईल.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
मनियार बिरादरीचे फारुक शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे मजहर पठाण, मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे अनिस शाह, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल,कादरीया फाउंडेशनचे फारुक कादरी, जननायक फाउंडेशनचे फरीद खान व फिरोज पिंजारी, तांबापुर फाउंडेशनचे आबीद शेख, अजिजशाह, व साहिल पठाण, एम आय एम चे सईद शेख, इसा शेख, अमजद खान, बेलदार बिरादरीचे नूर खान बेलदार व अलीम अहमद बेलदार, सलमान खान अमजद खान आदी उपस्थित होते.