बाबरचा कर्णधारपदाचा राजीनामा..

0

24 प्राईम न्यूज 16 Nov 2023

विश्वचषकातील सुमार कामगिरीनंतर बाबर आझमने बुधवारी पाकिस्तानच्या सर्व प्रकारांतील संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला बाबरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानला विश्वचषकात नऊ पैकी पाचच सामने जिंकता आले. त्यामुळे त्यांना पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. २०११च्या विश्वचषकानंतर पाकिस्तानला एकदाही उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. बाबरच्या नेतृत्वकौशल्यावर अनेकांनी प्रश्न निर्माण केले. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सध्या बाबरवर टीका करताना दिसले “पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मी घेतला आहे. हा निर्णय घेणे कठीण होते. मात्रहीच थांबण्याची योग्य वेळ आहे. पाकिस्तानच्या नव्या कर्णधाराला माझा पूर्ण पाठिंबा असेल,” असे बाबरने नमूद केले. विश्वचषक चालू असतानाच इंझमाम उल हकने पाकिस्तानच्या निवड समिती अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. काही खेळाडू बाबरच्या पसंतीचे असल्याने त्यांना संघात प्राधान्य दिले जात असल्याचे मत क्रीडा तज्ज्ञांनी नोंदवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!