मला माफी मागायची होती तरुणाला चापट मारल्यानंतर नाना पाटेकरांनी दिलं स्पष्टीकरण..

0

24 प्राईम न्यूज 17 Nov 2023

हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. याच दरम्यान त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या एका चाहत्याला चापट मारताना दिसत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेक जण नाना पाटेकर यांना ट्रोलदेखील करत आहेत. अशातच एका व्हिडीओमध्ये नाना पाटेकर यांनी यामागची खरी सत्यता सांगितली आहे.

नाना पाटेकर यांनी सांगितली व्हायरल व्हिडीओची सत्यता नाना पाटेकर यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं की, एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मी एका मुलाला मारलेले दिसत आहे, मात्र हा सिक्वेन्स आमच्या चित्रपटाचा भाग आहे. याची आम्ही रिहर्सल केली होती. आमची दुसरी रिहर्सल होणार होती. दिग्दर्शकाने मला सुरुवात करायला सांगितली. व्हिडीओमध्ये दिसणारा मुलगा आत आला तेव्हा आम्ही सुरुवात करणार होतो. मला वाटलं की तो आमच्या कूपैकी एक आहे म्हणून मी सीननुसार त्याला चापट मारली. नंतर मला कळले की तो कूचा भाग नव्हता.

नाना पुढे म्हणाले की, मी कधीही कोणाला फोटो काढण्यास नकार देत नाही. हे माझ्याकडून चुकून घडलं आहे. मी अशा प्रकारे कधीही कोणाला मारत नाही. मी आजपर्यंत असं कधीही केलं नाही. खूप जण माझ्यावर प्रेम करतात. त्यामुळे मी असं कधीच वागणार नाही. त्यावेळी मला त्याची माफी मागायची होती, पण तो घाबरून पळून गेला. आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही. दरम्यान, आता नानांचा हा व्हिडीओ पाहून अनेक जण ते खोटं बोलत असल्याचं म्हणत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!