विधानसभा नागपूर मधूनच लढविणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा..

24 प्राईम न्यूज 17 Nov 2023

मी विधानसभेचीच निवडणूक लढविणार आहे. तीदेखील माझ्या नागपूर मतदारसंघातूनच, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला. तसेच
आगामी लोकसभा निवडणूक पुणे किंवा मुंबईतून
लढणार असल्याच्या चर्चानाही देवेंद्र फडणवीस यांनी
फेटाळून लावले, मात्र भाजपच्या केंद्रीय निवडणूक
समितीचे सदस्य असलेल्या फडणवीस यांनी या समितीचे
अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या परवानगीने हे वक्तव्य केले की
स्वतःच आपल्या आगामी मतदारसंघाची घोषणा केली
यावरून वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.