मोदींना किंमत चुकवावी लागेल- – शरद पवार

24 प्राईम न्यूज 17 Nov 2023

सध्या मी कुठेच नाही, पण त्याची काळजी करू नका. मी कुठेच नसलो तरी सगळीकडे असतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापूरला आल्यावर मला म्हणाले की, शरद पवारांना काय समजते, पण लोकांनी त्यांच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे लोकांना हे समजते की काय करायचे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. शरद पवार यांनी गुरुवारी सोलापुरातील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाजप सोडून इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेची किंमत पंतप्रधान नरेंद्र मोदींना चुकवावी लागेल, असा इशाराही दिला.
शरद पवार पुढे म्हणाले की, मी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, शास्त्रीजी यांची भाषणे ऐकली. त्यावेळी पंतप्रधान कोणत्याही राज्यात गेले तर त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांबाबत अपमानास्पद बोलले नाहीत. मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत जे दुसऱ्या राज्यात जातात आणि भाजप सोडून दुसरा मुख्यमंत्री असला तर त्याच्यावर व्यक्तिगत हल्ला करतात. आता होत असलेल्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना याची किंमत चुकवावी लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.