लालपरीचा विक्रम; एकाच दिवसात कमवले ३५ कोटी..

0


24 प्राईम न्यूज 18 Nov 2023

मागील अनेक महिन्यांपासून तोट्यात असणाऱ्या एसटी
महामंडळाचे आर्थिक गणित हे सध्या सुसाट असल्याचं
पाहायला मिळतयं. कारण 16 नोव्हेंबर रोजी एसटी महामंडळाने 35 कोटी 18 लाख रुपये कमवून सर्वोच्च उत्पनाचा विक्रम रचला आहे. एसटीच्या 75 वर्षांच्या इतिहासातील एक दिवसांत मिळवलेल्या सर्वाधिक उत्पन्नापैकी हे सर्वाधिक उत्पन्न आहे दरम्यान यामध्ये पुणे (Pune) विभाग हे आघाडीवर आहे. पुणे
विभागातून 21 कोटी 52 लाख रुपयांचे उत्पन्न एसटी
महामंडळाला मिळाले आहे. त्याखालोखाल धुळे-नंदुरबार
विभाग हा दुसऱ्या क्रमांकावर असून या विभागातून 21 कोटी 25 लाखांचे उत्पन्न एसटीने मिळवलंय. तसेच जळगाव विभाग हा तिसऱ्या क्रमांकावर असून या विभागातून 18 कोटी 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. राज्यात कोणतीही घडामोड घडली
तर त्याचा थेट परिणाम हा एसटीवर होतो. ग्रामीण भागात एसटी हा प्रवाश्यांमध्ये एक महत्त्वाचा स्रोत आहे. पण अनेकदा या एसटीवर संकट कोसळ्याचं चित्र होतं. पण यंदाची दिवाळी ही एसटी महामंडळासाठी देखील खास ठरली. भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान 95 कोटी 35 लाख रुपयांचं उत्पन्न एसटीने कमावलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!