माझ्या शेपटीवर पाय ठेवू नकोस!
भुजबळांचा जरांगे-पाटलांना सज्जड दम..

24 प्राईम न्यूज 18 Nov 2023

जशास तसे उत्तर देऊ, ओबीसी आरक्षणात वाटेकरी होऊ देणार नाही आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत संतापलेल्या छगन भुजबळ यांनी एकेरी भाषेवर येत “माझ्या शेपटीवर पाय ठेवू नकोस!” अशा शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांना सज्जड दम दिला. बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाच्या तुटपुंज्या आरक्षणात वाटेकरी तयार केले जात आहेत. मात्र, आम्ही कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आमच्या वाट्याला याल तर याद राखा, असा इशारा देत भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.