ओबीसी बचाव लढा सुरुच ठेवा- -छगन भुजबळ.

24 प्राईम न्यूज 22 Nov 2023
राज्यातील ओबीसी समाज पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे. मी एकटा पडलेलो नाही. काही

नेते मंडळींची अडचण झाली असेल. काही मंत्री म्हणाले, भुजबळ यांच्या स्टेजवर जाणार नाही. माझी काही हरकत नाही. माझ्या स्टेजवर येऊ नका, स्वतंत्र बैठक घ्या. ओबीसी आरक्षणाचा बचाव करणे ही तुमची आणि माझी भूमिका एकच आहे. त्यामुळे तुम्ही रॅली घ्या, बैठक घ्या, पण ओबीसींचा लढा सुरू ठेवा, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मांडले.
ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात काही नेते माझ्या सोबत येतील, काही जातील हे चालूच राहणार आहे. काही लोकांच्या अडचणी असू शकतात. मला त्याबद्दल काही रोष नाही. या लोकांनी त्यांचे मन अंबडच्या सभेत मोकळे केले आहे. कुठेही जा पण ओबीसींसाठी लढा. माझ्या विरोधात बोलले तरी चालेल, पण ओबीसींच्या बाजूने बोला. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल. पण तुम्ही ओबीसींच्या विचारांशी एकनिष्ठ राहून समाजासाठी काम करावे एवढेच माफक अपेक्षा मी ओबीसी नेत्यांकडून करू शकतो, असा सल्ला छगन भुजबळ यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना दिला.