भुजबळांवर गुन्हा का नाही ? -मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला सवाल.


24 प्राईम न्यूज 22 Nov 2023 राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली पेटू नयेत यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करीत आहोत, मात्र हे सरकार सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करीत आहेत. कितीही गुन्हे दाखल करा, आमचा लढा सुरूच राहील. मात्र दुसरीकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये सातत्याने करीत असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. याचा अर्थ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीच छगन भुजबळ यांना पुढे घातलेय असा अर्थ आम्ही घ्यायचा का? सरकारच छगन भुजबळांना पाठबळ देत आहे का? या माध्यमातून सरकारलाच जातीय दंगली भडकवायच्या आहेत का, असा थेट सवाल मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला विचारला. ते मंगळवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते.