अल्पसंख्यांक समाजाला व त्यांच्या प्रार्थना स्थळाला सुरक्षा द्या..
महा मायनॉरिटी फोरम ची मागणी..

नंदूरबार/प्रतिनिधि
महाराष्ट्र राज्य मायनॉरिटी एनजीओ फोरम तर्फे
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना ११ मागण्याचे निवेदन २२ नोव्हेंबर रोजी
संस्थापक अध्यक्ष झाकीर हुसेन शिकलगार यांच्या हस्ते देण्यात आले.महाराष्ट्र राज्य मायनॉरिटी एनजीओ फोरम या अराजकीय संस्थेमार्फत महाराष्ट्रात अल्पसंख्यांक विकास हक्क अभियान राबवला जात असून बुधवार ते अभियान नंदूरबार जिल्ह्यात आले असता त्यांनी विविध अकरा मागण्यांचे निवेदन नंदूरबार उपर जिल्हाधिकारी सो. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नंदूरबार सो .यांना सादर केले. यावेळी समाजिक संघटना अल्पसंख्यक विकास मंडळ व नंदूरबार शहर व जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

(निवेदनातील प्रमुख मागण्या)
१८ डिसेंबर अल्पसंख्यांक दिन हा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय पदाधिकारी,

शांसकीय अधिकारी, शाळा, महाविद्यालय यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा, शासनाची खर्चाची २० हजाराची मर्यादा एक लाख रुपये करण्यात यावी, अशासकीय सदस्यांची नियुक्ती तातडीने करण्यात यावी, जिल्हा वार्षिक वित्तीय नियोजनामध्ये अल्पसंख्यांक लोकांसाठी राखीव कोटा ठेवण्यात यावा,पंतप्रधान १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, जातीय दंगे व दंगली झाल्या तर मानवी हक्क अधिकाराप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी , जिल्हाधिकारी कार्यालयातच मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा अल्पसंख्यांक विकास शाखा व वक्फ मंडळाचे कार्यालयअसे तिन्ही विभाग सुरू करण्यात यावे, शाळा व शिक्षण मध्ये अमुलाग्र बदल करावा, समाजात हेट स्पीच मुळे जाती-जमातीमध्ये द्वेशाचे वातावरण निर्मिती होत असल्याने अल्पसंख्यांक समाजाला असुरक्षितेची भावना वाढत चालली आहे या स्थिती त अल्पसंख्यांक मुस्लिम संरक्षण कायदा ची शिफारस करण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
(शिष्टमंडळात यांची होती उपस्थिती)
(अल्पसंख्यांक विकास मंडळ) चे संस्थापक व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शोएब खाटीक,
मुख्याध्यापक डॉ इशरत बानो,नूर सिकलीकर,
सैय्यद अबुल हस्नात, मन्नान सिकलीकर , शाहरुख खान,
माजी तलाठी मजीद सिकलिकर,आदींची उपस्थिती होती.