मी लेचापेचा माणूस नाही-अजितदादा

24 प्राईम न्यूज 26 Nov 2023
मी काही लेचापेचा माणूस

नाहीअसे प्रत्युत्तर शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना दिले. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय राज्यभरात चर्चेत आला असताना अजित पवार आजारी असल्याची टीका विरोधकांनी केली होती अजित पवार यांना राजकीय आजार तर झाला नाही ना, अशीही शंका घेण्यात आली होती त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, दिवाळीच्या आधी मला डेंग्यू झाला होता त्या आजारामध्ये माझे १५ दिवस गेले. दुर्दैवाने त्यावेळी राजकीय आजार अशा बातम्या पाहिल्या. मी काही असला लेचापेचा माणूस नाही. जी माझी मते असतात ती मी गेली ३२ वर्षांपासून स्पष्टपणे लोकांसमो मांडत असतो.
