शहीद टिपु सुलतान यांच्या जयंतीनिमित्त
नंदुरबारला विविध कार्यक्रम..

नंदुरबार/प्रतिनिधि हजरत फतेअली उर्फ शहीदेआजम शेरे महेसूर शहीद टिपु सुलतान यांची २७४ वी जयंती निमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही

शहीद टिपु सुलतान फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १० वाजता शहीद टिपु सुलतान चौक, बागवान गल्लीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच दुपारी १ वाजता अन्नदान वाटप

करण्यात आले. तसेच सायंकाळी साडेपाच वाजता भारत देश स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश इंग्रजांविरोधात लढणारे पहिले थोर महायुद्धा स्वतंत्र सेनानी हजरत फतेअली उर्फ शहीद टिपु सुलतान चौकात बागवान गल्ली येथे शहीद टिपु सुलतान व सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान व सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व पुष्पहार अर्पण करुन लहान मुलांना मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सलीम काझी, कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हा सरचिटणीस नासीर बागवान, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष लाला बागवान, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष हाशिम शाह, सलिम ठेकेदार, हे.कॉ.संतोश मागपुरे, विनायक गावीत, रतिलाल पावरा, शैलेश माळी, खुशाल माळी, प्रविण वसावे, सलीम ठेकेदार, खाटीक समाज युवाध्यक्ष आदील खाटीक, आरपीआय गवई गट जिल्हा उपाध्यक्ष आप्पा वाघ, सामाजिक कार्यकर्ते संदीप बैसाणे, शहीद टिपु सुलतान फाऊंडेशनचे उपाध्यक्ष दानिश बागवान, मुस्तफा खाटीक आदी उपस्थित होते. यावेळी एजाज बागवान म्हणाले की, आमच्या सामाजिक, शैक्षणिक सेवाभावी संस्थेतर्फे वर्षभर आपल्या भारत देशासाठी ज्यांनी-ज्यांनी ब्रिटीश इंग्रजांविरोधात भारत देश आझाद व स्वतंत्र होणेसाठी प्राणाची आहुती दिली आहे, त्यांचे आम्ही जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करीत राहतो. राजकीय पुढारी आपल्या वाढदिवस साजरा करण्यासाठी असंख्य बॅनरबाजी, शुभेच्छा बॅनरबाजी व हजारो रुपये खर्च करतात, परंतू ज्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे, त्यांची जयंती किंवा पुण्यतिथी मनविण्यासाठी त्यांना विसर पडतो. टिपु सुलतान यांच्या कार्याची माहिती देवून त्यांच्या विचारावर चालण्याची गरज असल्याचे एजाज बागवान यांनी सांगितले. प्रास्ताविक नासिर बागवान यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लाला बागवान यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इरफान खाटीक, जाकीर शाह, पप्पू खाटीक, साहील बागवान, जुबेर खाटीक, बाला शेख, इबा खाटीक, शकील खाटीक आदींनी परिश्रम घेतले.