ना.अनिल पाटील यांच्या हस्ते आजही अनेक ठिकाणी भूमिपूजन.. – – भव्य योगा हॉल,पिंपळे रस्ता व इतर विकास कामांचा समावेश..

अमळनेर/प्रतिनिधि
अमळनेर ना.अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून काल न्यू प्लॉट परिसर तसेच बाजारपेठेती

ल प्रमुख रस्त्यांच्या भूमीपूजनाचा धमाका झाल्यानंतर आजही पुन्हा मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते अनेक ठिकाणी भूमिपूजनांचा बार उडणार आहे.
यात प्रामुख्याने भव्य योगा हॉल,पिंपळे रस्ता व इतर महत्वपूर्ण रस्ते आणि विकास कामांचा समावेश आहे.नगरविकास विभागाच्या माध्यमातून मंत्री अनिल पाटील यांनी सुमारे 12.50 कोटी निधीतून 20 कामे मंजूर केली असून भूमिपूजनांतर तात्काळ कामांना सुरुवात होणार आहे.
आज येथे होणार भूमिपूजन समारंभ
आज सोमवार दि 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा 50 लक्ष निधीतून योगा हॉल चे बांधकामाचे भूमिपूजन अन्नपूर्णा मंगल कार्यालय जवळ होईल,सकाळी १०.१५ वा 1 कोटी निधीतून पिंपळे रोड वरील पुलाचे भूमिपूजन मरीमाता मंदिर पुला जवळ होईल,सकाळी १०.३० वा 75 लक्ष निधीतुन पिंपळे रोड ते शिरोडे सर यांच्या घरापर्यंत काँक्रीटीकरण या कामाचे भूमिपूजन होईल, सकाळी १०.४५ वा 2 कोटी निधीतून पिंपळे रोड ट्रीमिक्स करणे या कामाचे भूमिपूजन होईल,सकाळी ११.०० वा बोरसे कॉलनी येथे 40 लक्ष निधीतुन खुला भूखंड विकसित करणे या कामाचे भूमिपूजन राजुभाऊ यांच्या घराजवळ बोरसे कॉलनी येथे होईल.त्यानंतर सकाळी ११.१५
चोपडा रोड ते नितीन बिऱ्हाडे यांच्या घरापासून ते टाकरखेडा रोड पर्यत रास्ता करणे या ४९ लक्ष निधीतील कामाचे गोल्डी बिऱ्हाडे यांच्या घराजवळ भूमिपूजन होईल,आणि शेवटी सकाळी ११.३० वा 50 लक्ष निधीतून गट नं ३५०/१ मध्ये रस्ता व गटार बांधकाम करणे या कामाचे मंगळ ग्रह मंदिर मागे सुयोग कॉलनी येथे भूमिपूजन होईल.