आमचे आरक्षण रद्द झाल्यास तुमचेही रद्द होईल-मनोज जरांगे..

24 प्राईम न्यूज 27 Nov 2023

शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीवर त्यांना वाटतेय आपली तर दहशत आहे. वय झाल्यामुळे भुजबळ असे बोलतात, दुसऱ्या समाजाबद्दल आकस असेल, तर त्यांचे केस पांढरे होऊन उपयोग काय, कायद्याच्या पदावर बसायचे आणि असली भाषा बोलायची. त्यांना चांगले माहीत आहे, त्यांनी काय काय खुंट्या ठोकून ठेवल्यात त्या, आता आम्हीही खुंट्या तयार ठेवल्या आहेत, असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.
जोडायला अक्कल लागते हे आधीच त्यांना कळायला हवे होते. मराठ्यांनी त्यांना उंचीवर नेऊन ठेवले, हे त्यांना कळायला हवे होते. आमचे आरक्षण रद्द झाले तर तुमचे ऑटोमॅटिक रद्द होईल, कारण ओबीसींच्या शासकीय नोंदी नाहीत.तुम्ही ओबीसी आणि मागास नाही, आम्हाला कुणीही बाहेर काढू शकत नाही. मी दिवस रात्र सांगतोय की, ओबीसी-मराठा यांनी एकमेकांच्या अंगावर जायचे नाही. बोर्ड काढा हे त्यांचे आवाहन जातीयवादी नाही तर काय आहे. मी पाय तोडून घ्यायला तयार, पण आरक्षण मिळवूनच दाखवणार आहे. या सभेला त्यांनी दंगल सभा नाव द्यायला हवे. ते पांढरे झालेले जुनाट नेते आहेत, असा टोला जरांगे-पाटलांनी तायवाडे यांना लगावला.
राज्यात होत असलेल्या एल्गार सभांतून मंत्री छगन भुजबळ हे मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यात दंगली व्हाव्यात, यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याचे सभेतील नेत्यांच्या भाषणांतून दिसत असल्याने या सभांना आता दंगल सभा म्हणायला हवे, असा हल्लाबोलही मनोज जरांगे-पाटील यांनी केला.