मुंबई येथे २६ /११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन श्रद्धांजली अर्पण…

दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख
दोंडाईचा पोलिस ठाणे व महाराष्ट्र पोलीस बाॅईट संघटना यांच्या वतीने रक्तदान

शिबिर आयोजित करण्यात आला. पोलिस अधिकारी व जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दोंडाईचा पोलिस ठाण्यात रक्तदान शिबिर घेण्यात आला.दोंडाईचा चे 25 पोलीसांनी केले रक्तदान मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोंडाईचा पोलीस ठाण्याच्यावतीने रक्तदान शिबिर घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
२६ रोजी येथील दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या वतीने दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर शहादा ब्लड बँक(रक्तपिडी) च्या सहकार्याने रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.विशेषतःपोलीस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी, पोलीस बॉईज संघटना व शहरातील तरुण वर्गाने उत्स्फुर्तपणे रक्तदान करून शहीद झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच शिबिरात 25 रक्तदात्यांनी रक्तदान केल.
यावेळी दोंडाईचा पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास ताटीकोंडलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश काळे, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सोनवणे, एएसआय राजन दुसाने, हेडकॉ प्रवीण निंबाळे,पोलीस बॉईज संघटनाचे धुळे जिल्हाध्यक्ष मोईन शेख(मोनूबाबा),गणेश चकणे,दों होमगार्ड प्रभारी अनिल ईशी, शहराध्यक्ष कृष्णा परदेशी,हर्षल पाटील आदी उपस्थित होते शिबीर यशस्वीतेसाठी पोलीस बॉईज संघटनाचे मोईन शेख
कृष्णा परदेशी,गणेश चकणे,हर्षल पाटील,कादिर खान,यांनी सहकार्य केले..
