आता संयमाची गरज ! – मुख्यमंत्री शिंदे..

24 प्राईम न्यूज 24 Dec 2023
मनोज जरांगे-पाटील यांनी दि. २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा व त्याच दिवशी मुंबईत तीन कोटी मराठा आंदोलक येणार असल्याच्या दाव्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे. “सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण संदर्भातील क्यूरेटिव्ह याचिका स्वीकारली आहे. त्यावर २४ जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत कायदेतज्ज्ञांची फौज आपली बाजू प्रभावीपणे मांडेल. महाआघाडी सरकार ती बाजू भक्कमपणे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडण्यात कमी पडले होते. त्या त्रुटी दूर करून पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार सदैव सकारात्मक आहे. क्यूरेटिव्ह याचिकेमुळे मराठा आरक्षणासाठी एक खिडकी उघडली आहे. त्यामुळे आता सर्वांनीच संयमी भूमिका घेतली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.