कर्नाटकात हिजाब बंदी उठवली..

24 प्राईम न्यूज 24 Dec 2023. कर्नाटक राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावरील बंदी मागे घेण्याच्या निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. कर्नाटकातील महाविद्यालयांत हिजाच वापरण्यावर तत्कालीन भाजप सरकारने निर्णय घेतला होता. त्यावरून जोरदार वादंग झाले होते. हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. या निर्णयावर भाजपने शनिवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्ताधारी काँग्रेस ‘फोडा आणि राज्य करा’ या ब्रिटीश धोरणाला पुढे नेत आहे. हे पाऊल शैक्षणिक संस्थांच्या ‘धर्मनिरपेक्ष स्वरूपा’बद्दल चिंता वाढविणारे आहे, असे भाजपने म्हटले आहे.
कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी सिद्धरामय्या बांच्यखवर शैक्षणिक वातावरण बिघडवल्याचा आरोप केला. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. ते म्हणालेकी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिल्याच्या एका दिवसानंतर ही प्रतिक्रिया आली आहे, पोशाख आणि जेवणाची निवड वैयक्तिक आहे, असेही त्यांनी या संबंधात बोलताना सांगितले. काँग्रेस सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत विजयेंद्र म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी हिजाबवरील बंदी मागे घेणार असल्याचे बेजबाबदार विधान केले आहे. अशा प्रकारे त्यांनी राज्यातील शैक्षणिक वातावरण बिघडवले आहे. किमान त्यांच्या घाणेरड्या राजकारणापासून मुलांना तरी वाचवायला हवे होते. कॉंग्रेसला हिजाबवरील बंदी उठवायची आहे, तर दुसरीकडे परीक्षेला बसलेल्या हिंदू महिलांना त्यांचे ‘मंगळसूत्र’ आणि पायाच्या अंगठ्या काढायला लावल्या, असाही दावा त्यांनी केला.