भाजपच्या निष्ठावंतांना धक्का-उद्धव ठाकरे..

24 प्राईम न्यूज 14 Feb 2024
अशोक चव्हाण भाजपात गेल्याने किंवा इतर कुठला नेता भाजपात गेल्याने त्यांच्या मूळ पक्षाला नव्हे तर भाजप आणि आरएसएसच्या निष्ठावंतांना धक्का बसतो. आज त्यांना असाच एक मोठा धक्का बसला आहे, असा टोला शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. ते मंगळवारी अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील सभेत बोलत होते. मी मागच्याच सभेत बोललो होतो की, त्यांची परिस्थिती ही, आता मला नाही अबू… मी कशाला घाबरू… अशी झाली आहे. जो निर्लज्ज असतो तोच सदासुखी असतो. काहींना मुख्यमंत्रीपदावरून हटवून उपमुख्यमंत्री केले तरीही आनंदात आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली..