पक्ष हिरावून घेण्यामागे अदृश्य हात – सुप्रिया सुळे

24 प्राईम न्यूज 16 Feb 2024
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या वडिलानी स्थापन केलेला पक्ष आणि निशाणी हिरावली जाण्यामागे अदृश्य हाताची शक्ती असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. मात्र आपण निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी पक्ष व निशाणी अजित पवार गटाला देण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शरद पवार हेच राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष होते, आहेत, आणि असतील, असा विश्वास देखील बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ज्या माणसाने पक्ष उभारला, त्याची निशाणी ठरवली स्थाच्याचकडून या दोन्ही गोष्टी हिरावून घेतल्या गेल्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. कारण ज्या व्यक्तीने पक्ष उभारला तो पक्ष अन्य कुणाला देण्याचा हा चुकीचा पायंडा पडणार आहे. इतिहास याची नोंद घेणार आहे, अशी उद्विग्नता देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली..