मतदारसंघाचा सर्वांगिण विकास हेच ध्येय – आ.चिमणराव पाटील..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळामतदारसंघातील जे घटक,गांव मुख्य प्रवाहात नाहीत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आज सुरू असुन प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा मानस आहे,न भुतो न भविष्यती अशी सिंचन व्यवस्था तसेच पिण्यासाठी पाणी,रस्ते,पुल इतर मुलभुत सुविधा या क्षेत्रातील कामे आज मार्गी लागून मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगिण विकास हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.
पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्र. ऊ.ते पिंप्री प्र.ऊ पुलाचा बांधकामासाठी तब्बल १२ कोटी रूपयांचा भव्य भुमीपुजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील,शेतकी संघाचे संचालक चतुर पाटील,जिजाबराव पाटील,जि.प.मा.कृषि सभापती डाॕ.दिनकर पाटील,जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय पाटील,विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे,तालुकाप्रमुख मधुकर पाटील,उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील,बाजार समितीचे मा. उपसभापती दगडु पाटील, मा. संचालक भैय्यासाहेब पाटील, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष डाॕ. राजेंद्र पाटील,मा.उपाध्यक्ष सखाराम चौधरी,मा.संचालक दासभाऊ पाटील,शेतकी संघाचे संचालक प्रकाश पाटील, भिडुभाऊ जाधव,साहेबराव पाटील,पिंपळकोठा सरपंच भैय्यासाहेब पाटील,बहादरपुर मा.सरपंच गोकुळ चौधरी,मुंदाणे प्र.ऊ.सरपंच एकनाथ पाटील, वाघरे सरपंच रावसाहेब पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार चिमणराव पाटील पुढे म्हणाले की,गेल्या अनेक दशकांपासुन या पुलासाठी ग्रामस्थांची मागणी होती,त्यासाठी योग्य तो पाठपुरावा करून आज या पुलाचा कामासाठी १२ कोटी रूपये इतका निधी मंजुर करण्यात आला,आता ग्रामस्थांची कायमची दैनंदिन समस्या दुर होऊन त्यांची मागणी पुर्ण करतांना मला देखील मनस्वी आनंद होत आहे.दरम्यान, निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचा दोनही गावांचा वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात अमोल पाटील यांनी ह्या पुलाचा मंजुरीसाठी केलेल्या पाठपुराव्याची माहीती देऊन मतदारसंघाचा इतर लोकाभिमुख विकासकामांचा लेखाजोखा उपस्थित ग्रामस्थांसमोर मांडला.
——————————————————–
पिंप्री प्र.ऊ.हे गांव वसल्यापासुन गावाला लागुनच बोरी नदीचे पात्र आहे. पावसाळ्यात दैनंदिन या गावाचा दळणवळणाचा मोठा प्रश्न उद्भवयाचा तर नदीपात्रात पाणी आले कि,ह्या गावाचा पुर्णपणे संपर्क तुटायचा.परिणामी दैनंदिन दळणवळण,आरोग्य,शिक्षण आदी मोठ्या समस्यांना ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत होते. ही परिस्थिती बदलावी व या गावाचा सर्वांगिण विकास होवुन, मुख्य प्रवाहात आणण्याचा आमदार चिमणराव पाटील यांचा प्रयत्न व अमोल पाटील यांची संकल्पना होती.
———————————————————