स्वात्त गायिकीच्या दुनियेतील बेताज बादशाह पंकज उधास यांचे निधन..

24 प्राईम न्यूज 27 Feb 2024. आपल्या धीरगंभीर आवाजाने ‘चिठ्ठी आयी है’…’ और आहिस्ता किजीए बाते’…’ना कजरे धार’… आदी गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ गझल गायक व पार्श्वगायक पंकज उधास यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.ते ७२ वर्षांचे होते. त्यांची कन्या नायाब हिने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

‘नाम’, ‘साजन’, ‘मोहरा’ या गाजलेल्या चित्रपटांबरोबरच अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी ११ वाजता त्यांचे निधन झाले. बॉलीवूडमध्ये गेल्या चार दशकांहून अधिक काळ पंकजजींनी आपल्या गायकीने वेगळी ओळख तयार केली होती. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडसह त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
८० च्या दशकात पंकजजींनी त्यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तब्बल चार दशकांहून अधिक काळ ते संगीत विश्वात सक्रिय होते.