कुणी मर्यादेबाहेर गेले की कार्यक्रम करतोच-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

24 प्राईम न्यूज 27 Feb 202

राज्य सरकारमधील सहकारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्या मनोज जरांगे- पाटील यांच्या विरोधात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आक्रमक झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत सर्व ठीक होते. आता एका मयदिबाहेर गेल्यावर कार्यक्रम करतोच, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधान भवन परिसरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी बोलताना केले. मुख्यमंत्र्यांचे हे विधान प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात टिपले गेले आणि क्षणात ते व्हायरल झाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चा रंगली होती.