आदर्श नागरिक आणि समाजभिमुख व्यक्तिमत्व म्हणून उदयास आला पाहिजे हाच शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा उद्देश.. -असे प्रतिपादन गट शिक्षणअधिकारी रावसाहेब पाटील

0
शितल आईस क्रीम चे होलसेल विक्रेता

अमळनेर /प्रतिनिधि. विद्यार्थ्यांची उन्नती म्हणजे समाज आणि राष्ट्राची उन्नती होय. विद्यार्थी शाळेत फक्त शिकून आणि टिकन उपयोग नाही तर तो देशाचा आदर्श नागरिक आणि समाजभिमुख व्यक्तिमत्व म्हणून उदयास आला पाहिजे हाच शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा उद्देश आहे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत अमळनेर येथील प्रताप हायस्कूल मध्ये २६ ते २८ दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना दर्जेदार ,गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले गेले पाहिजे, सामाजिक मूल्ये , पर्यावरण पूरक ,व्यवसायिक शिक्षण दिले गेले पाहिजे यासाठी शिक्षकांना नवनवीन तंत्रज्ञान शिकवण्यात आले. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी निरंजन पेंढारे , प्रमिला अडकमोल , डॉ भाग्यश्री वानखेडे , सुहास खांजोळकर , संजय सैंदाणे , असमालोद्दीन काझी , किरण सनेर ,जी एम पाटील , दिनेश निघोट यांनी शिक्षकांना प्रशिक्षण दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!