नवनीत राणांची खासदारकी धोक्यात..

24 प्राईम न्यूज 29 Feb 202

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत शीख चांभार दस्तऐवजाच्या आधारे मोची जातीचा दाखला देणे शक्य नाही, असे म्हणणे मांडत राज्य सरकारने नवनीत राणांना वैध जात प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. यामुळे नवनीत राणांची खासदारकी धोक्यात आली आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. याप्रकरणी दोन आठवड्यांत निकाल येण्याची शक्यता आहे.