पिंपळे येथे नविन वाचनल्याचे उद्घाटन. -पाहीलेले स्वप्न प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरवण्यासाठी आज आपल्याला काय करावे लागेल याचा विचार करा. – डाॅ. योगेश पाटील

0


प्रतिनिधी । पिंपळे/अमळनेर

जीवनामध्ये स्वप्न बघून प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवण्यासाठी आज पल्याला काय करावे लागेल याचाही विचार करा असे प्रतिपादन विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ योगेश पाटील यांनी केले. पिंपळे येथील नवीन वाचनालयाच्या उद्घाटनचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. यावेळी निंबा चौधरी हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ योगेश पाटील, विजयसिंग पवार,उमेश काटे, जगदीश पाटील, डी. बी. पाटील व श्री अविनाश पाटील उपस्थित होते.

शितल आईस क्रीम चे होलसेल विक्रेता

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. पूज्य श्री साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ शिरसाळे येथील उपक्रमशील शिक्षक विजयसिंग पवार यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाचे अनुभव कथन करुन कशा पद्धतीने संघर्षातून जीवन यशस्वी करायचे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच कै सु. आ. पाटील माध्यमिक विद्यालय शिक्षक जगदीश पाटील व डी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध शैक्षणिक वाटांविषयी मार्गदर्शन केले. तसेच नवीन वाचनालयसाठी पुस्तके विजयसिग पवार, डी. बी. पाटील यांनी आणू दिली. अविनाश पाटील पुस्तके ठेवण्यासाठी एक कपाट दिले. वाचनालय आपल्या गावात आजपासून सुरवात करण्यात आले अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त अभ्यासाचा लाभ होईल ग्रामीण भागातील विद्यार्थी काळानुसार भवितव्यात पुढे जावा यासाठी सर्व शिक्षकांचे वेळो
वेळी मदतीचा हात पुढे येत आहे यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामपंचायत सरपंच वर्षा पाटील,सदस्य संतोष चौधरी, ग्रामस्थ पुरुषोत्तम चौधरी, जयवंत पाटील,निबा चौधरी, भिका पाटील,भैय्या पाटील,जगन पाटील,काशिनाथ पाटील उपस्थित होते सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील सरांनी केले व आभार प्रदर्शन युवराज पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!