पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे स्नेहसंमेलन व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न..


अमळनेर प्रतिनिधी 1 March 2024. पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे दिनांक 24-02-2024 रोजी स्नेहसंमेलन व बक्षिस वितरणाचा कार्यक्रमाचे उद्घाटक श्री समाधान पारधी लोकनियुक्त सरपंच मंगरुळ ,प्रमुख पाहुणे भाऊसाहेब देशमुख (निवृत्त प्रशासनाधिकारी नगरपालिका अमळनेर ) व कार्यक्रमचे अध्यक्ष श्यामकांत भदाणे (माजी व्हाईस चेअरमन ग. स. सोसायटी जिल्हा जळगाव) , संस्थेचे चेअरमन चंद्रकांत भदाणे सर,संस्थेचे कार्यकारीसंचालक अॅड. भैय्यासाहेब मगर सर, तसेच संस्थेचे सर्व संचालक यांच्या हस्ते द्विप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची. सुरवात मेरे भारत का या गाण्यांपासून करण्यात आली, राधे राधे, छोटा बच्चा, गोविंदा, मेरा वाला डान्स, राधा तेरी चुनरी, असे विविध प्रकारच्या गाण्यावर सर्व विद्यार्थ्यांनी डान्स केला तसेच मोबाईल या संकल्पनेवर नाटक केले ITI चे विद्यार्थ्यांनी अहीराणी गाण्यांवर डान्स सादर करुन सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे मन जिंकले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रज्ञा पाटील मॅडम यांनी केले तसेच पर्ल इंटरनॅशनल स्कूल विषयी मार्गदर्शन चेअरमन भदाणे सर यांनी , तर आभार प्रदर्शन जयश्री पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खाटीक सर ITI चे प्राचार्य प्रकाश पाटील सर, प्रमोद पाटील सर, सचिन माळी सर, सुनिल मगरे सर, विजय चौधरी सर, सखाराम पावरा, उमेश पाटील, राजु पाटील यांनी सहकार्य केले.