१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी टुंडा निर्दोष..

24 प्राईम न्यूज 1 Mar 2024
देशातील ५ शहरांमध्ये १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यतील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा (८४) याची गुरुवारी राजस्थानच्या अजमेर येथील विशेष टाडा न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे, तर याच प्रकरणात इरफान आणि हमीदुद्दीन या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2

तब्बल ३० वर्षांनंतर टाडा न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. अनेक बॉम्बस्फोट प्रकरणांत आरोपी असलेला टुंडा सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.