आजपासून दहावीची परीक्षा..

24 प्राईम न्यूज 1 Mar 2024
शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली महाराष्ट्र राज् माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा (राज्य मंडळ) १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना राज्य मंडळाने केल्या आहेत. राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. निवडणूक आचारसंहिता लागली, तरी परीक्षेवर फारसा परिणाम होणार नाही.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.