अमळनेर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी भागवत केशव सूर्यवंशी यांची निवड.

0


अमळनेर/प्रतिनिधी. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष श्री नानाजी पटोले यांच्या आदेशानुसार ,जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब प्रदीपराव पवार यांनी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदी दिनांक 3 मार्च 2024 रोजी भागवत केशव सूर्यवंशी यांची निवड केलेली आहे. बी.के. सूर्यवंशी हे खवशी बुद्रुक तालुका अमळनेर चे रहिवासी असून ते बऱ्याच दिवसापासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत, पक्षाशी एकनिष्ठ आहेत. सदरच्या निवडीबद्दल त्यांचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीपराव पवार, आधीचे तालुकाध्यक्ष गोकुळ आबा बोरसे,शहराध्यक्ष मनोज बापू पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य के डी बापू पाटील, माजी युवक तालुका अध्यक्ष गजेंद्र साळुंखे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष अलीम मुजावर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव आशुतोष पवार, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव तुषार संदानशिव, युवक तालुकाध्यक्ष महेश पाटील यांनी आभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!