चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या.

अमळनेर/ प्रतिनिधी. अमळनेर तालुक्यातील मारवड येथील पोलीसांनी अटक केलेला संशयित आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत (४९) मूळ रा. दोंदवाडे ता. चोपडा, हल्ली मुक्काम डांगरी ता. अमळनेर याने अमळनेर पोलीस ठाण्यातील लोकअप मध्ये पोलीस कोठडीत जेरबंद असतांना शनिवारी सकाळी पांघरुणाची चिरोटी फाडून, आतील शौचालयात जावून खिडकीचा गजाच्या आधारे गळफास घेत आत्महत्या केली. गार्डवरच्या पोलीसाच्या निदर्शनास सदर प्रकार येण्याच्या आतच त्या आरोपीने गळफासाने आत्महत्या केली होती. याघटनेने जिल्ह्यात उडाली आहे. खळबळ आतापर्यंतची अमळनेरची असली ही पहिलीच घटना होय म्हणून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अमळनेर तालुक्यात मारवड येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन आहे. पण तेथे लोकअपची सोय नसल्याने तेथील अटकेतील आरोपी अमळनेर पोलीस ठाण्यातील ठाण्यातील कोठडीत डांबण्यात येतात. डांगरी हे गाव मारवड पोलीस ठाण्यान्तर्गत येते. आरोपी घनश्याम कुमावत हा बकरी चोरीच्या गुन्ह्यात ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत जेरबंद होता. त्याची करणखेड्याच्या विद्युत तारा चोरीत संशयित म्हणून ९मार्चपावेतो अमळनेर कोर्टाने पोलीस कोठडीची मुदत वाढवून दिलेली होती. हल्ली तो आरोपी अमळनेर पो.स्टे. च्या लॉकअप मध्ये बंद होता. आज शनिवारी त्या आरोपीला पुन्हा अमळनेर कोर्टात मारवड पोलीसांनी आणले असते. त्या आधीच सदर आरोपीने लॉकअप मधील शौचालयात चादरीची पट्टी फाडून घेत गळफासाने आत्महत्या केली.
घटनेचे वृत्त कळताच जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी चाळीसगाव भागाच्या अप्पर पोलीस अधिक्षका कविता नेरकर, अमळनेरचे डीवायएसपी सुनिल नंदवाळकर त्याचप्रमाणे एलसीबी, सीआयडी तसेच फॉरेन्सिक पोलीस पथकाने अमळनेरला भेटी दिल्या. प्रेताचा पंचनामा अमळनेरला करण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी डेड बॉडी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आली. त्याची अमळनेर पो. स्टे.ला प्राथमिक नोंद घेणे उशिरापर्यंत चालू होते. पुढील तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे.