रविवारी ३१ मार्चला बँका सुरू.

24 प्राईम न्यूज 26 Mar 202

देशभरातील सर्व बँका रविवारी सार्वजनिक सुट्टीनिमित्त बंद राहतात, मात्र केंद्र सरकारच्या विनंतीवरून भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रविवार ३१ मार्च २०२४ रोजी बँकांच्या सर्व शाखा सुरू ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. रविवार असला तरी हा दिवस आर्थिक वर्ष २०२३-२४ चा अखेरचा दिवस असल्याने बँका या दिवशी काम करतील, जेणेकरून प्राप्ती आणि देयकांशी संबंधित सर्व सरकारी व्यवहारांची नोंद ठेवता येईल. सर्वसामान्य ग्राहकांना नेहमीप्रमाणेच सर्व सुविधा उपलब्ध असतील.
प्रत्येक महिन्याच्या रविवारी आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात, परंतु परिपत्रकानुसार रविवार ३१ मार्च रोजी सर्व बँका त्यांच्या नियमित वेळेनुसार उघडतील आणि बंद होतील. शनिवार ३० मार्च रोजीही सर्व बँका सुरू राहणार आहेत. एनईएफटी आणि आरटीजीएस व्यवहारही मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील. सरकारी धनादेश मंजूर करण्यासाठीही विशेष तरतूद करण्यात येणार आहे.
