लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पालिकेतर्फे विनामूल्य भरण्याची सुविधा. – नगरपालिका हायस्कुल व अग्निशमन विभागात सुविधा केंद्र..

अमळने/प्रतिनिधी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म येथील नगरपालिके तर्फे विनामूल्य भरण्याची सुविधा करण्यात आली असून यासाठी दोन ठिकाणी सुविधा केंद्र करण्यात आले आहेत.
इंदिरा भुवन समोरील अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात व नगरपालिका माध्यमिक विद्यालयात अश्या दोन ठिकाणी केंद्र असणार असून सकाळी ८ ते दुपारी २आणि दुपारी २ ते रात्री ८पर्यंत अश्या दोन शिफ्ट मध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. वरील वेळेत सदर केंद्रावर लाभार्थीचे अर्ज स्वीकारणे, तपासणे, पोर्टलवर अपलोड करणे आदी सर्व कामे विनामूल्य केली जाणार आहेत. तरी महिला भगिनींनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर व उपमुख्याधिकारी तथा योजनेचे नोडल अधिकारी संदीप गायकवाड यांनी केले आहे.