अंमळनेर को. ऑप. अर्बन बँकेच्या चेअरमन व व्हॉईसचेअरमन निवड आज. -यानिमित्ताने स्वागत सत्कार समारंभ.


अमळनेर /प्रतिनिधी. येथील शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड १५ जुलै २०२४ रोजी होणार आहे.या प्रसंग संचालक मंडळाच्या सभेसह नवनिर्वाचित चेअरमन व्हाइस चेअरमन यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम बँकेच्या परिसरात ठेवण्यात आलेला आहे.
दि.अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड सकाळी ११.३० वाजता सहकारी संस्था सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एम. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.मावळते चेअरमन मोहन सातपुते व व्हॉईस चेअरमन प्रदिप अग्रवाल यांच्या राजीनाम्यानंतर सदर निवड होत आहे.अमळनेर शहरातील सहकार व अर्थ क्षेत्रातील केंद्रबिंदू असलेली दि अमळनेर को. ऑप.अर्बन बँक शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे.बँकेचे हजारो सभासद संपूर्ण तालुक्यात असल्याने बँकेच्या वाटचालीकडे अमळनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातील लोकांचे लक्ष असते.सदर कार्यक्रमास बँकेचे सन्माननीय सभासद हितचिंतक ग्राहक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.