तहसील कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


आबिद शेख/अमळनेर. अमळनेर सन २०२३ – २४ मध्ये महसूल प्रशासनंतर्गत चांगली कामगिरी केल्याबद्दल अमळनेर येथील उपविभागीय व तहसील कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महसूल कार्यालयातील तलाठी प्रवीण सोनवणे , महसूल सहाय्यक मुकेश काटे व उपविभागीय कार्यालयातील शिपाई महेंद्र शिरसाठ यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
वर्षभरात प्रामाणिक आणि चोख कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सन्मान केला. यावेळी विविध अधिकारी हजर होते. प्रवीण सोनवणे ,मुकेश काटे व महेंद्र शिरसाठ यांचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , नायब तहसीलदार रवींद्र जोशी व महसूल कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.