काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक दोंडाईचा शहराध्यक्षपदी इरफान सैय्यद यांची निवड.

दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख
शहरातील सामाजिक कार्यकर्ते इरफान सैय्यद यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे दोंडाईचा शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व धुळे जिल्हा काॅंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष हसनदादा पठान यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक दोंडाईचा शहर अध्यक्षपदी येथील इरफान सैय्यद यांची नियुक्ती करण्यात आली.
काँग्रेस कमिटीच्या धुळे जिल्हा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हसनदादा पठान यांनी नियुक्ती पत्रात नमूद केले. दोंडाईचा अल्पसंख्याक शहर अध्यक्षपदी इरफान सैय्यद यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिले.
तसेच दोंडाईचा शहर युवा काॅंग्रेसचे शेख मोनु बाबा, दाऊद शेख, कादिर भाई, मोहसिन भाई, विशालभाऊ, मनोज भाऊ, दोंडाईचा युवा काॅंग्रेसचे कार्यकर्ता देखील उपस्थित होते.